📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

धक्कादायक: चार वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेले

विशाल क्षिरसागर |  मातेरेवाडी
रविवार- ३ ऑक्टोबर २०२१
नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्यांचा विविध भागात मोठा धुमाकूळ सुरू असून जुने धागुर (ता.दिंडोरी) शिवारात एका शेतमजुराच्या चार वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास  घडली आहे,  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,  वनविभागाचे कर्मचारी, पोलिस तथा ग्रामस्थ बालिका व बिबट्याचा शोध घेत आहेत.
शेतात काम करण्यासाठी वनोली, सुतारपाडा (गुजरात) येथील काही जण जुने धागुर येथील एक द्राक्ष उत्पादक शेतकरी माळी यांच्याकडे आले आहेत, आज (रविवार) सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील शेड मध्ये सदर मजूर स्वयंपाक करीत असताना अचानक कुठून तरी एक बिबट्या तेथे आला, बिबट्याने त्यांच्या कुटुंबातील चार वर्षीय बालिकेवर हल्ला करुन बालिकेला घेऊन आळंदी धरण परिसरात जंगलाच्या दिशेने पळून गेला, घटनेनंतर भेदरलेल्या आई व बालिकेच्या इतर नातलगांनी आरडाओरडा करीत तिचा शोध सुरू केला. परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस व वन प्रशासनास या घटनेबाबत कळविले, त्यानुसार पोलीस व वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे, मात्र रात्री उशिरापर्यंत बिबट्या व बालिकेचा शोध लागला नव्हता.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने