📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कसमादे मीडियाचा दणका, अखेर 'त्या' हल्लेखोर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द!

मालेगाव (मनोहर शेवाळे) मालेगाव कृषि उत्त्पन्न बाजार समिती आवारात शेतमाल विक्रीच्या कारणावरुन वाद घालत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.५) घडला.
 या मारहाणीचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे,  कसमादे अपडेटने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. 
अखेर कसमादे मीडियाच्या वृत्ताची दखल घेवून सदर व्यापाऱ्यासह आणखी एकाचा परवाना शेवटची चौकशी होईपर्यत निलंबित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी कसमादे अपडेटचे आभार मानले आहे.


जळगाव जिल्ह्यातून शेतमाल विक्रीसाठी आलेल्या पवार या शेतकऱ्यांना शेतमाल तिकडे का विक्रीला लावला या कारणावरुन शेतकऱ्याला रात्री एक वाजेच्या सुमारास व्यापाऱ्याकडून मारहाण झाली आहे. या मारहाणीचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व रोष पसरला आहे,  

सदर व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह, प्रहार शेतकरी संघटना व विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती.
 दरम्यान कसमादे मिडिया टीम सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करीत होती, शेवटी गुरुवारी कृषि उत्त्पन्न बाजार समितीने एका पत्रकाद्वारे येथील धनश्री व्हेजीटेबल कंपनी मालेगाव व रेणुकामाता व्हेजीटेबल कंपनी या दोन्ही फर्मचा  पुढील आदेश प्राप्त होईपर्यत परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

आज  बाजार समिती संचालक व व्यापारी यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती त्यामध्ये सदर शेतकऱ्यांनाही बोलविण्यात आले होते, संचालक मंडळाने शेतकऱ्याचे गाऱ्हाणे ऐकून घेतले, व बाजार समिती तुमच्या बरोबर असून तुम्ही निर्धास्तपणे पोलिसात तक्रार करा, परंतु यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार करण्यास नकार दिला, शेतकऱ्याचे म्हणणे होते की त्याला बाहेरच्या लोकांनी मारले, तरीही सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संचालक मंडळाने चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले आहे, या घटनेची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे, ही त्रिसदस्य समिती सदर घटनेबाबत बाजार समितीला अहवाल सादर करेल त्या अनुषंगाने सदर घटनेतील संशयित व्यापाऱ्यांच्या परवा व्यापक विचार केला जाईल, जर दोषी आढळले तर त्यांचा परवाना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात येईल, याशिवाय बाजार समिती आवारात कुठल्याही शेतकऱ्याला कधीही काहीही अडचण असल्यास बाजार समितीच्या कार्यालयात येऊन तक्रार करू शकता बाजार समितीचे कार्यालय 24 तास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू राहील, यापुढे यापुढे बाजार समिती आवारात अशी घटना पुन्हा घडणार नाही याची खबरदारी बाजार समिती संचालक मंडळातर्फे घेण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही भीती दडपणाला बळी न पडता थेट कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन समिती सभापती राजेंद्र जाधव यांनी केले.

कसमादे अपडेट च्या पाठपुराव्यामुळे सदर गोष्टीचा तपास योग्य दिशेने व निष्पक्ष होणार आहे, तपासात कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा केला जाणार नसून यापुढे भविष्यात असा प्रकार घडणार नाही याकडेही लक्ष देण्यात येईल असे संचालक मंडळाने कसमादे अपडेट शी बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने