📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यात अवैध शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गुल्लेर जप्त

 ज्ञानेश्वर आढाव | प्रतिनिधी: देवळा
          देवळा तालुका वन विभागाने वन्य जीव सप्ताह चे आयोजन केले आहे.देवळा तालुक्यातील दहिवड या गावात डोंगर दऱ्या व जंगलाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे तेथे जंगली प्राण्यांचा वावर जास्त असतो. त्यामुळे तेथे असणाऱ्या जंगली प्राण्यांची शिकार केली जाते. प्राण्यांची शिकार करण्यासाठी गुल्लेर हत्यार वापरले जाते .त्यानिमित्ताने  आज वनविभागाने शनिवार दि. 2 ऑक्टोबर 2021 महात्मा गांधी,लाल बहादूर शास्त्री जयंतीचे  औचित्य साधून वन विभाग देवळा यांचे वतीने वन्य जीव सप्ताह पर्वणी साधत वन्य प्राणी जीव हत्येस कारणीभूत असलेल्या *गुल्लेर* दहिवड ता देवळा जि नाशिक परिसरातील शिवारातून जप्त करण्यात आल्या.
सदर कामगिरी वन विभाग कर्मचारी एम .एम.साळुंखे ,आर.आर.साळुंखे यांनी पार पाडली.
जप्त गुल्लेर ग्रामपंचायत कार्यालय दहिवड येथे आणण्यात आल्या. सदर प्रसंगी सरपंच आदिनाथ ठाकूर ,उपसरपंच मनिष ब्राम्हणकार ,ग्रामविकास अधिकारी सुर्यवंशी ,प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर ,ग्रामस्थ विलास देवरे राजेंद्र ,कुमावत दादाजी गमन पुंजाराम देवरे ग्रा प कर्मचारी योगेश पवार ,संतोष सोनवणे दिनेश दयाराम देवरे ,गंगाधर अहिरे, रविंद्र कु-हाडे आदी उपस्थित होते.

कळवण देवळा व्हाट्सअप ग्रुप या लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने