📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कुंपणानेच शेत खाल्ले! बँक मॅनेजरकडूनच १३ लाख ८० हजाराला गंडा; पोलिसात गुन्हा दाखल!

जय योगेश पगारे | नाशिक 

 जादा व्याजाचे आमीष दाखवून बँक मॅनेजरनेच ग्राहकाला सुमारे १३ लाख ८० हजाराला गंडाविल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. 
राजेंद्र देवराम जाधव (वय ६०, आडगाव ) असे फसवणूक झालेल्या ग्राहकाचे नाव आहे, त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ॲक्सिस बँकेतील मॅनेजर संशयित अमित दिलीप कुलकर्णी (पार्वतीबाईनगर पिंटो कॉलनी, जुना सायखेडा रोड दसक) याच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेली माहीती अशी  ॲक्सिस बँकेत मॅनेजर असलेल्या अमित कुलकर्णी याने राजेंद्र जयराम जाधव यांना जास्त व्याजाचे आमीष दाखवून१ जानेवारी २०१८ ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान  बँकेत खाते असलेल्या राजेंद्र जाधव यांच्या खात्याची माहीती घेऊन राजेंद्र जाधव यांना संपर्क करून बँकेत बोलावून घेतले, गोड गोड बोलून तुमचा अधिक फायदा करून देतो दुसरीकडे पैसे गुंतवल्यास तुम्हाला जास्तीत जास्त व्याजाचा परतावा मिळेल असे आमीष दाखवून त्यांच्याकडून सह्यांचे धनादेश घेतले. बँकेतील मॅनेजर नेस आपल्याला या गोष्टी सांगितल्या मुळे जाधव यांच्या मनातही याबाबत थोडीही शंका आली नाही याचाच गैरफायदा घेत जाधव व त्यांच्या पत्नीच्या खात्यावरुन वेळोवेळी पैसे काढून १३ लाख ८० हजार ३०० रुपयांचे नुकसान केले नाशिक तक्रार जाधव यांनी पोलिसांना दिली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे पुढील तपास करीत आहे







साभार इंडिया दर्पण लाईव्ह

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने