नांदगाव (मनोहर शेवाळे ) गेल्या अनेक दिवसांपासून नांदगावात मुसळधार पाऊसामुळे सबवे मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी वरच्या बाजूने रेल्वे लाईन क्रॉस करून जावे लागते, त्यामुळेच आज सबवे मध्ये पाणी असल्याने रेल्वे लाईन क्रॉस करून जातांना रेल्वेचा धक्का लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्वाती रवींद्र शिंदे असे दुर्दैवी महिलेचे नाव असून
मंदिरातून दर्शन घेऊन येतांना आज पहाटे ही दुर्घटना घडली
आता तरी ' सबवे ' प्रश्नाबाबत रेल्वे प्रशासनाला जाग येईल का ?
या परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सबवे मध्ये पाणी असल्याने नागरिकांना रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो, या आधी एक व्यक्ती बुडून जाताना नागरिकांचे मदतीने वर काढून त्याचा जीव वाचविण्यात आला होता
प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अद्याप पावेतो त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे महिलेच्या मृत्यूनंतर नांदगावकर संतप्त झाले असून या प्रश्नावर ताबडतोब तोडगा काढण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकानी यावेळी दिला.