📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव व परिसरात संततधार, हा पाऊस किती दिवस ठोकणार मुक्काम?

मालेगाव (जय योगेश पगारे) पहाटेपासूनच मालेगाव व परिसरात संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सहाजिकच  राज्यात परतीचा मान्सून कधी येणार या प्रश्नाचे उत्तर नक्की सर्व शेतकरी शोधत असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असलेल्या अनेक गाजत असलेले अचूक हवामान अंदाज देणारे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी परतीचा मान्सून बद्दल चा एक महत्त्वाचा अंदाज सांगितलेला आहे.
 दोन ते नऊ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मुक्काम असणार आहे, यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे, मालेगाव सह उत्तर महाराष्ट्रात संततधार पाऊस होणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत, मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा फटका कोकणासह लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नांदगाव, तसेच चाळीसगाव कन्नड औरंगाबाद या परिसरात आधीही पावसाने थैमान घातले होते परंतु या परतीच्या मुसळधार पावसाची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केली आहे, त्यामूळे नागरिकांनी सतर्क रहावे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने