प्रशांत गिरासे | देवळा
नाशिक -वणी- सापुतारा व सुरगाणा पोलिस, पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र गुजरात सिमेलगत ठाणापाडा हॉटल साईश्रद्धा समोर, केलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा (तंबाखू जन्य ) हस्तगत करण्यात आला.
नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगळे , कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड , यांच्या मार्गदर्शनाने काल ,दि .३० सप्टेबर रोजी ठाणापाडा ,हतगड हद्दीतील पोलिस तपासणी नाक्यावर सुरगाण्याचे स.पो.नि.निलेश बोडके, पो. पराग गोतुरणे, पो.हवालदार जे.डी .ठुमसे, पो .काॅ संतोष गवळी यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास सापळा रचला, व गुप्त महितीच्या आधारे वाहनांची तपासणी करण्यात आली, यानंतर स्वराज महिंद्रा कंपनीच्या टेम्पो क्र एम एच .१५ एच एच .२४१६ ह्या महामार्गावर वरून जात असताना पोलिस कर्मचारी टेम्पो मध्ये काय आहे, अशी विचारपूस केली असता चालक संदिप गायकवाड उडवा उडवीचे उत्तर देऊ लागल्याने ,या वाहनांची तपासणीत महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असताना सुध्दा गुजरात हुन महाराष्ट्र मध्ये जाताना पकडण्यात आले, आज ता 1 रोजी अन्न व सुरक्षा प्रशासनचे अधिकारी अविनाश सर, गुप्तवार्ता अधिकारी गोपाल कासार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यात गाडीचा तपासणी केली असता विमल पान मसाला , तंबाखू जन्य गुटखा, पान मसालाच्या ६६ गोणी तसेच त्यात मिक्स करावयाच्या ३४ असा लाखोंच्या मुद्देमाल जप्त आला , या प्रकरणी चालक संदिप गायकवाड,कुणाल मेने,रा.देवळा या दोंघाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.