प्रशांत गिरासे | नाशिक प्रतिनिधी
🛑ताडपत्री धरून केला अंत्यविधी
🛑जिल्ह्यातील दुसरी घटना
🛑स्मशानभुमी पासुन वंचित ग्रामपंचायतीकडे राज्यसरकार का लक्ष देत नाही.
पेठ तालुक्यातील पाहूचीबारी येथे स्मशानभुमी शेड अभावी भरपावसात एका मृतदेहाची अवहेलना झाल्याचे समोर आले आहे.एका तरूणाचे अल्पशा आजाराने निधन झाले माञ गावात अंत्यविधीसाठी स्मशानभुमी शेडचं नसल्यामुळे काही तास पाऊस थांबण्याची वाट पाहून अखेर संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपञीचा आधार घ्यावा लागला.माञ कसेबसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.कधीकधी तर पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात.पुन्हा पाऊस उघडल्यावर सरणावर लाकडे टाकावी लागत असल्याने मृतदेहाची अवहेलना होते.
पेठ तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील अनेक भागात अद्यापही स्मशानभुमी शेड नाही.आदिवासी भागात दरवर्षी लाखो रूपयांचा निधी खर्च केला जातो तो कोणाच्या खिशात जातो याची चौकशी केली पाहिजे.अनेक गावात स्मशानभुमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखलातून कशीबशी वाट काढत जावे लागत आहे हीच परिस्थिती पाहूचीबारी गावातील आहे त्यामुळे मरणानंतरचा प्रवास देखील खडतर बनला आहे.