📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वाहन धुण्यासाठी सोबत नेलेला मुलगा पूरपाण्यात वाहून गेला; टेहऱ्यातील दुर्घटना

मालेगाव | मनोहर शेवाळे
वाहन धुण्यासाठी गेलेला मुलगा पूरपाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना गुरुवारी सायकाळच्या सुमारास टेहरे पुलाजवळ घडली. 
श्री .अविनाश मोतीराम बच्छाव (रा.टेहरे) हे आपला मुलगा सौरभ अविनाश बच्छाव वय वर्ष ११ नदीकाठावर आपली गाडी धुण्यासाठी गेले असता सौरभ चा पाय घसरुन पडल्याने सौरभ पाण्याच्या  प्रवाहात खेचला गेला.ही घटना समजताच पंचायत समिती सदस्य अरुण माऊली पाटील यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोचून तीन कर्मचारी टेहरे पुल आणि तीन कर्मचारी गिरणा पुलाजवळ सौरभचा शोध घेऊ लागले, मात्र रात्र झाल्याने अंधारात बचावकार्याला अडथळा निर्माण झाला. सर्वत्र अंधार असल्याने सौरभचा शोध अजून पावेतो लागला नाही, अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शकील अहमद, विकास बोरगे, कृष्णा कोळपे, राहुल जाधव, निजाम शेख हे प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना रात्री आठ वाजेपर्यंत यश आले नाही, सकाळी परत 7 वाजता अग्निशमन दलाचे कर्मचारी सौरभ चा शोध घेतील असे बचाव पथकातील अग्निशमन दल कर्मचारी शकील अहमद शेख यांनी सांगितले.

दरम्यान नागरिकांना पूर पाण्याजवळ जाऊ नये अशी वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, वास्तविक गिरणा नदीला एरवीपेक्षा जास्त वेगात पाण्याचा प्रवाह सुरू आहे, अशावेळी आपल्या लहान मुलांना अशा ठिकाणी नेणे नक्कीच दुर्घटनेचे निमंत्रण ठरू शकते. वाहने धुण्यासाठी अनेक ठिकाणी सर्विस सेंटर उघडलेली आहेत, परंतु नागरिक मोठ्या प्रमाणात नदीकिनारी वाहने धुण्यासाठी गर्दी करीत असतात, याशिवाय महिलाही धुणे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात काठावर गर्दी करीत असत शिवाय आपल्यासोबत आपल्या घरातील लहान लहान मुलांनाही आणत असतात, परंतु अशामुळे स्वतःच्या व सोबत आणलेल्या लहान
 मुलांचेही जीवितास धोका निर्माण होतो, नागरिकांनी या गोष्टी गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे असून अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने