मालेगाव (मनोहर शेवाळे ) उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गिरणा धरण 100% क्षमतेने भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा नदी काठी असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठी असलेल्या नागरिकांनी आधीच सावधानता बाळगत आपली व आपल्या गुराढोरांची काळजी घ्यावी.
गिरणा धरण तसेच मोसम नदी परिक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरण आज सकाळी शंभर टक्के भरले आहे, काल सायंकाळी गिरणा धरणात ९६ टक्के पाणी साठा होता. मात्र कालपासून गिरणा धरण क्षेत्रावरील नदीच्या पाण्याने वाहत असून आज मितीस गिरणा धरणात पाच हजार क्युसेसने पाणी येत आहे. त्यामुळे आज सकाळी गिरणा धरण गिरणा धरण सलग तिसर्यादा पूर्णक्षमतेने भरल्यामुळे चाळीसगावसह भडगाव, पाचोरा, मालेगाव तालुक्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे, धरण भरल्यामुळे ५००० क्युसेसने खाली गिरणा नदीत सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.
आज सकाळी गिरणा धरणाचे चार दरवाजे एका फुटाने उघडण्यात आले असून या गेटमधून सहा हजार क्युसेस पाणी गिरणा नदीतून वाहत आहे. नदीतील सोडलेले पुराचे पाणी आवक नुसार कमी, जास्त होऊ शकते, तरी नदीकिनाऱ्यावरील सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पाटील यांनी केले आहे.
गिरणा धरण क्षेत्रावरील वरची सर्व धरणे भरल्यामुळेे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून काल सायंकाळी गिरणा धरणात ९६ टक्के पाणी साठा होता. मात्र कालपासून गिरणा धरण क्षेत्रावरील नदीच्या पाण्याने वाहत असून आज मितीस गिरणा धरणात पाच हजार क्युसेसने पाणी येत आहे.
व्हिडिओ बघा:
