📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

विक्रीसाठी जिवंत काडतुसे व रिव्हॉल्वर आणणाऱ्या सराईतास विशेष पथकाकडून शिताफीने अटक

नाशिक (मनोहर शेवाळे)
  नाशिक जिल्हात वाडीव-हे भागात पेट्रोलींग करीत असतांना  विशेष पथकाने गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आणनाऱ्या इसमास सापळा रचून अटक केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की  पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे कार्यालय यांना त्यांचे गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, वाडीव-हे पोलीस स्टेशन हद्दीत ओल्ड प्रभु टाबा येथे काही वेळाने इसम नामे मनीष सिंह तोमर रा. मध्य प्रदेश हा आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट व तपकिरीचा रंगाच टी शर्ट घातलेला असुन त्याने त्याच्यातसेच  कमरेस एक गावठी बनावटीची पिस्टल बाळगुन ते विक्री करता येणार आहे या बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा.पोलीस उपमहानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करणेकामी आदेश दिले, 

   विशेष पथकाने गोंदे दुमला शिवारातील ओल्ड प्रभु ढाबा येथे  खाजगी वाहन थांबवून सदर ठिकाणी रेडचे नियोजन केले व पथक अंधारात सदर ईसमाची वाट पाहत उभे असतांना तेथे काही वेळाणे वरील वर्णनाचा एक इसम येतांना दिसला,  बातमी प्रमाणे सदर इसम हा तोच असल्याची खात्री झाल्याने त्याचेकडे जावुन त्यास १७.४५ वा.जागीच पकडले. त्यानंतर पकडलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) मनीष सिंह तोमर वय.२८ वर्षे रा. आत्मज गोपाल सिंह तोमह वार्ड नं. १०, अम्बाह था मोरेना मध्य प्रदेश सध्या रा. फ्लॅट नं. २०१, सी १ बिल्डींग, आनंदवन सोसायटी, गोंदे दुमाला ता. इगतपुरी नाशिक असे सांगितले. पकडलेल्या इसमास  अंगझडती घेतली असता त्याचे कमरेच्या डाव्या बाजुस पॅटमध्ये खोचलेले एक गावटी बनावटीचे घातक अग्निशस्त्र (पिस्टल) व दोन जिवंत काडतुस मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे
१) २५,०००/- रू.कि.चे एक लोखंडी धातुचे काळसर रंगाचे गावठी बनावटीचे अगिशस्त्र (पिस्टल) त्यास चॉकलेटी रंगाची प्लस्टीक कव्हरची मुठ असलेली मॅगझीन सह 1000 रु.कि.चे दोन जिवंत काडतुस असा एकूण
२६,०००/- रु.कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने