📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भारतात घातपात घडविण्याचा डाव दिल्ली पोलिसांच्या STF ने उधळवला, सहा दहशतवाद्यांना अटक

दिल्लीत पाकिस्तानचा मोठा दहशतवादी कट उघड झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांना, तर एकूण सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, “यासाठी ‘मल्टी स्टेट ऑपरेशन’ करण्यात आले.
या कारवाईदरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांव्यतिरिक्त, आणखी चार लोकांना व एकूण सहा लोकांना अटक करण्यात आली. त्यांना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून पकडण्यात आले आहे. सण-उत्सवाच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याचा या सर्वांचा डाव होता. ‘आयएसआयएस’पासून ‘अल कायदा’पर्यंत सर्वच दहशतवादी संघटना एकत्रितरीत्या हल्ले करणार होत्या. पण, त्याआधीच त्यांच्या नापाक मनसुब्यांवर पाणी फेरण्यात दिल्ली पोलिसांनी यश मिळवले."
 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने