देवळा (ज्ञानेश्वर आढाव)
महाराष्ट्र शासनाच्या ई पिक पाहणी संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.सुरुवातीला ई पिक पाहणी ॲप कसे डाऊनलोड करायचे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पिक पाहणी नोंदणी करण्यात आली.यावेळी अनेक समस्या मांडण्यात आल्या. ई पिक पाहणी नोंदणीसाठी नेटवर्कची समस्या बऱ्याच शेतकऱ्यांनाली कारण ई पिक पाहणी ही बांधावर जाऊन करावी लागते. बऱ्याच भागात शेतकरी हे डोंगर माथ्याला राहतात.त्यामुळे त्यांना जास्त अडचणींचा सामना करावा लागत आहे.यासाठी ई पिक पाहणी नोंदणीसाठी मुदत वाढ मिळावी यांची प्रामुख्याने मागणी केली. यावेळी सरपंच प्रदीप निकम यांनी मंडळ अधिकारी यांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या समस्या आपण शासन दरबारी मांडण्याची विनंती केली.यावेळी मंडळ अधिकारी यांनी आपण शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडू असे आश्वासन दिले.