📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नवीन तहसील कार्यालयात स्टॅम्प वेंडर यांना जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रहारचे देवळा येथे वाघ्या मुरळी आदोलन..

 ज्ञानेश्वर आढाव (प्रतिनिधी)देवळा

    दि.१४/९/२०२१

जुन्या तहसिलदार कार्यालयातील मुद्रांक विक्रेते नवीन प्रशासकीय इमारत वा रोड कार्यालयात स्थानांतरित करा या मागणीसाठी श कृष्णा जाधव उपजिल्हाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना नाशिक, श्री दशरथ पुरकर जिल्हा कार्याध्यक्ष, संजय दहिवडकर तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना देवळा, भाऊसाहेब मोरे जिल्हा संघटक, शहराध्यक्ष हितेंद्र आहेर व प्रहार संघटना विविध पदाधिकारी बेमुदत उपोषणाला बसले होते.



उपोषण स्थळी कांदा उत्पादक संघनेचे जिल्हा सरचिटणीस दुष्यंत पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ बाळासाहेब पवार ता.संघटक भऊर दिनेश देवरे सुनील पगार रामेश्वर रमेश पवार खर्डे उमेश सोनवणे सावकी एन एस भामरे खुंटेवाडी यांनी भेट दिली

उपोषण स्थळी मा नायब तहसीलदार काथेपुरे, नायब तहसीलदार गायकवाड  यांनी भेट देऊन सदर विषयी प्रशासनाने दखल घेतली असून पुढील कार्यवाही बाबतचे लेखी आश्वासन दिले, तदनंतर लिंबू पाण्यानें उपोषणाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने