प्रतिनिधी:- राकेश आहेर | चांदवड देवळा
देवळा तालुका सध्या अनेक कारणाने चर्चेत ठरतो आहे. आधी अवैध वाळु उपसा, नंतर बनावट मुद्रांक घोटाळा, तसेच अंगणवाडी पोषण आहाराची पाकीटे परस्पर खाली करुन ती जाळण्याचा प्रकार आणी अता मालेगाव येथुन गुजरातकडे नेण्यात येणारा रेशनचा तांदुळ तोही देवळा तालुक्याच्या उमराणे हद्दीतच पकडण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता डॉ. बी.जी शेखर साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक, यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे मिळालेल्या बातमी प्रमाणे मालेगाव ते नाशिक हायवेवर उमराणे उडाणपुलाजवळ रेशममोती वजनकाट्यासमोर ललीत शेठ रा. मालेगाव यांचे हस्तक चालक रविद्र पंडीत पाटील वय. २८ वर्षे रा.सायने बुद्रुक मालेगाव व क्लीनर दिनेश पवार वय १९ रा.मतुरपाडा, येसगाव ता. मालेगाव जि.नाशिक हे मालेगाव ते उमराणे मार्गे वापी राज्य गुजरात येथे शासकीय सार्वजनिक वितरणाचे तांदुळ अवैध रित्या विक्री करण्याचे उद्देशाने अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे ट्रक क्र एम.एच. ४१ जी. ६८१५ या मध्ये सुमारे दिड लाख - रुपये किमतीचे सुमारे ५० किलो वजनाचे एकुण २०० कट्टे त्यात शासकीय सार्वजनिक वितरणाचे तांदुळ धान्य किमंत बाजारभाव प्रमाणे १५ रुपये प्रती किलो तसेच (शासकीय किमती प्रमाणे ३ रुपये प्रती किलो ) सह एकुण ६, ५०,००० किमतीचे मुद्देमालासह मिळुन आल्याने वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय देवळा ता. देवळा जि.नाशिक, याबाबत देवळा पुरवठा निरीक्षक ज्योती ज्ञानेश्वर कपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देवळा पोलीस ठाणे येथे भाग ६ प्रमाणे जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई ही मा. डॉ. बी.जी शेखर, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली असुन चालक व क्लीनर दोघांना अटक करण्यात आली आहे.