प्रशांत गिरासे | देवळा
देवळा शहरातील गुंजाळनगर येथे २१ वर्षीय तरुण, पियुष आहेर याने शनिवारी दुपारी आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी गुंजाळनगर येथील रहिवासी मंगेश सुकदेव आहेर यांचा मोठा मुलगा पियुष मंगेश आहेर (वय-२१ ) याने शनिवारी दुपारी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली.
पियुष लायटिंग भाड्याने देण्याचा व्यवसाय करीत होता त्यांचा कडे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पियुषला फोन केला असता प्रतिउत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी घरात जाऊन त्यांच्या आईकडे विचारणा केली आईने पियुष माडीवर असल्याचे सांगितल्यानंतर कर्मचारी माडीवर गेले असता त्यांना पियुषने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले, पियुषचे काका योगेश आहेर यांनी देवळा पोलिसांत घटनेची खबर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला, त्यांनतर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेचे आणखी दुर्दैव असे की उद्या पियुष चा वाढदिवस होता, आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही,
याबाबत अधिक तपास देवळा पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गवळी ,अरुण आहिरे आदी करीत आहेत.