लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघात
हायवा ट्रक आणि ॲपेरीक्षा धडकेत पाच जण ठार.
लासलगाव (मनोहर शेवाळे) लासलगाव-विंचूर रोड वरील मंजुळा पॅलेस समोर ॲपे रिक्षा आणि हायवा ट्रक यांच्यामध्ये झालेल्या जोरदार धडकेत रिक्षामधील पाच जण जागीच ठार झाल्याची घटना आज दि.25 सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत लासलगावी अंत्यविधीसाठी लोणी ता. राहता येथील दोन जणांचा समावेश आहे, अन्य तीन पुरुषही या भीषण अपघातात मरण पावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लासलगाव हुन विंचूर च्या दिशेने निघालेली ॲपे रिक्षा क्रमांक MH15, 4461 मध्ये रिक्षाचालकासह पाच जण प्रवास करत असताना विंचूरहून लासलगाव च्या दिशेने निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने जागेवरच पाच जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना लासलगाव मध्ये घडलेली आहे.
मृतांमध्ये सुहास मनोहर निकाळे (40 )विंचूर, रिक्षाचालक- विठ्ठल बाजीराव भापकर ( 65) लोनी प्रवरा,भाऊसाहेब बाळासाहेब नागरे (60) लोणी प्रवरा,किसनदास बैरागी (60) धारणगाव खडक,रतन पवार (40) इंदीरा नगर विंचूर यांचा समावेश आहे.
यातील दोन प्रवाशी लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे भाऊसाहेब पठारे यांचे कडे अंत्यविधी साठी सकाळीच आले होते.
अंत्यविधी कार्यक्रम आटोपून परत आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला,
अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले, अपघातग्रस्त पाचही जणांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ अमित घोंगडे यांनी तपासणी केली असता चार जण मृतावस्थेत आढळून आले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, या गंभीर अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव डॉक्टर असोसिएशन चे सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ आणि डॉक्टर विलास कांगणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन उपचारासाठी मदत केली.