📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत! पुन्हा पाडला पाळीव प्राण्यांचा फडशा..

 ज्ञानेश्वर आढाव | देवळा प्रतिनिधी
              देवळा तालुक्यातील दहिवड येथे हिंस्त्र जंगली प्राण्यांचा मुक्त वावर पुन्हा एकदा आढळून आला आहे,  दहिवड या गावाला भौगोलिकदृष्ट्या जंगल व डोंगराचा भाग लाभलेला त्यामुळे तेथे जंगली प्राण्यांचा मुक्त वावर ग्रामस्थांना पाहवयास मिळतो.
          दहिवड या गावातील बऱ्याच लोकांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे. यापूर्वीही बिबट्याच्या हल्यात अनेक पाळीव प्राण्यांना आपला जीव गमावला आहे, आज दहिवड येथील श्री.रमेश संतोष देवरे हे त्यांच्या मेंढ्या चारण्यासाठी वघाऱ्या डोंगर गेल्यावर तेथे बिबट्याने केलेल्या हल्यात एका मेंढीचा मुत्यू झाला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मेंढपाळ व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
 सर्व मेंढपाळ -व्यावसायिकांनी वन विभागाला विनंती केली आहे की लवकरात लवकर या बिबटयाचा बंदोबस्त करावा, या परिसरातील नागरिक जीव मुठीत धरून शेतातील कामे करीत आहेत बिबट्याच्या दहशतीने परिसरातील सर्व नागरिक धास्तावलेले आहेत,
 मालेगाव तालुक्यातही मागील आठवड्यात वडगाव परिसरात वन विभागातर्फे एक बिबट्या जेरबंद करण्यात आला, त्या अनुषंगाने या भागातही पिंजरे लावून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्व नागरिकांनी केली आहे  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने