📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मरणानंतरही हाल संपेनात! शेड नसल्याने भरपावसात ताडपत्री लावून अंतिम संस्कार

सुरगाणा (प्रशांत गिरासे )

  • पिळूकपाडा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची झाली अवहेलना 
  • सरण रचतांना चितेवर घ्यावा लागला चक्क ताडपत्रीचा आधार 
  • संततधार पावसामुळे अंतिम संस्कार करण्यात अडथळे येतात मृतदेह अर्धेच जळतात त्यामुळे त्यांची होते अवहेलना 
  • अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखलातून काढावी लागते वाट

तालुक्यात पावसाळ्यात कित्येकदा संततधार पावसामुळे अंतिम संस्कार करण्यात अडथळे येतात मृतदेह अर्धेच जळतात, पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागत असल्याने मृतदेहांची अवहेलना होते. सुरगाणा तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील अनेक भागात अद्यापही स्मशानभूमी नाही. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. त्यामुळे आदिवासी भागात अनेक ठिकाणी मरणानंतरचा प्रवास देखील खडतर बनला आहे.


सरण ही थकले मरण पाहुणी..मरणानंतरही भोगाव्या लागतात  नरक यातना..

 या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणा-या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत मधील  पिळूकपाडा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची झालेली अवहेलनेची वस्तुस्थिती आहे.

पिळुपाडा येथे एका  वाहन चालकाचे आकस्मित  निधन झाले. त्याच वेळी सकाळ पासूनच  संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर  चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे  

जागरूक ग्रामस्थांनी या गोष्टीवर प्रकाश पाडला.



  तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागते आहे,  शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. माळेगावच्या ग्रामपंचायतीत ७ गावे समाविष्ट असून माळेगांव, भरडमाळ, केळुणे, सालभोये, पिळूकपाडा, पाथर्डी,पारचापाडा या एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विना स्मशानभूमी विरहित एकमेव तालुक्यातील ग्रामपंचायत तर नाही ना असे म्हणण्याची वेळ आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने