नंदुरबार (जययोगेश पगारे)सामाजिक सलोखा बंधुभाव, प्रेम याची शिकवण देणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार मुस्लिम वारकरी, प्रबोधनकार ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांचे नंदुरबार येथील एका गावात कीर्तन करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले,
मूळचे घनसावंगी जिल्हा जालना येथील वारकरी वैकुंठवासी ताजुद्दीन महाराज शेख संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विनोदी शैलीने व प्रबोधनात्मक किर्तन करण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध होते
नंदुरबार जिल्ह्यातील जामोद या गावी काल दिनांक 27 रात्री कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता कीर्तन करीत असतानाच अचानक त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने ते जमिनीवर बसले व आपल्या सहकारी कीर्तनकाराच्या मांडीवर डोके ठेवले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असतानाच रात्री दोन वाजता ते वैकुंठवासी झाले.
हभप ताजुद्दीन महाराज शेख यांना हिंदू धर्मभूषण व हिंदू भूषण अशा अनेक पदव्या मिळाल्या होत्या, सबंध भारतात त्यांच्या कीर्तनाची आवड होती व त्यांच्या कीर्तनाचे चाहते जगभर पसरलेले आहे.
वारकरी सम्प्रदायाचा जरी पटका मराठी जनताजनार्धनाच्या हदयात कायम फडकत ठेवनारे हिंदु मुस्लिम एकतेच्या अखंड प्रेरणाश्रोताच्या अभंगांच्या स्वराला आपण कायमचं पारखं झालो आहोत, खुप वर्षापुर्वी देवी दाक्षायणी मंदिर लासुरगाव येथे किर्तन सेवा सुरू असतांना महाराजांच्या मातोश्री रात्री जग सोडून गेलेल्या असतांनाचा तातडिचा निरोप आला तरी महाराजांनी खंड पडू न देता संपुर्ण किर्तन अत्यंत संयमाने विनयशिलतेणे पुर्ण करून किर्तनाच्या शेवटि समस्त वैष्णवांना कल्पना देवून रजा घेतली घेतली होती, मी स्वतः किर्तनसेवेला हजर होतो व त्या दिवसापासुन हरिभक्त परायण तोजोद्दिन महाराजांसमवेत त्या सर्व वारकरी सम्प्रदायाचा आदर मनात कायमचा घर करून राहिलेला आहेच,
आज बाबांच्या आयुष्यभराच्या तत्वांच्या वर्तणुकीतून किर्तन करता करता वैकुंठवास घडाला या सारखी भाग्याची इहलोकिची यात्रा सर्वांना लाभो, हे पंढरीनाथा विठ्ठला पांडूरंगा आज तुझा भक्त तुझ्या चरणी कायमचा येत आहे, चुकभूल माफ करून सेवा पावण करून घे ही विनम्र प्रार्थना : कांतीराम शेजुळ पाटील