📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पुढील दोन ते तीन दिवस दुपारी ३ ते ७ पर्यंत शेतातील कामे टाळावीत: प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई (प्रशांत गिरासे)येथील प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार पुढील 2 दिवसांत नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी 28 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीच्या काळात खबरदारी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्र केंद्राच्या सूचनेनुसार  28 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. तसेच नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये, त्याचप्रमाणे आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. डोईफोडे यांनी केले आहे.

  पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये, कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली / पाण्याच्या स्त्रोताजवळ / विदयुत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने व मालेगाव लाईव्ह न्युज देखीलआपणास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने