राकेश आहेर | चांदवड देवळा
देवळा तालुक्यातील गुंजाळनगर येथील शाळेच्या बोगद्याजवळ सायंकाळच्या सुमारास नाशिकहून साक्रीकडे जाणाऱ्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी तरुणाला चिरडल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साक्री आगाराची एसटी बस ( क्र.एम.एच .१३ सी.यू .७३०६ ) ही बस नाशिकहुन साक्रीकडे जात असतांना गुंजाळनगरजवळ शाळेच्या बोगद्याजवळ रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल एकनाथ पानपाटील ( वय ३० वर्षे ) रा. गुंजाळनगर असे मृत तरुणाचे नाव असून लहुजी शक्ती सेनेचे दिपक पानपाटील यांचे ते बंधू आहेत.
एसटी बसने तरुणाला १० ते १५ फुटापर्यंत फरपटत नेल्याने मृतदेह रस्त्यावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.