📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पाण्याचा अंदाज न आल्याने चालवत नेली एस टी बस; अनेक प्रवाशांसह पुराच्या पाण्यात वाहून गेली

प्रशांत गिरासे | वृत्तसेवा

🛑चालती बस वाहून जातानाच थरार
🛑स्थानिकांनी ताबडतोब मदत कार्य सुरू केले
🛑घटनास्थळी पोलिस प्रशासन हजर
🛑अनेक प्रवासी वाहून गेल्या पाची भीती

 यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव नाल्याला आलेल्या पुरात बस वाहून गेली। या बस मध्ये 4 ते 6 प्रवासी प्रवास करत होते। त्या पैकी एका चा मृतदेह सापडला। तर दोघांना वाचविण्यात यश आले। ही घटना सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली। 
नांदेड - नागपूर ही घटरोड डेपो ची बस उमरखेड हुन पुसद मार्ग नागपुर साठी निघाली, उमरखेड पासून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते, या पाण्याचा अंदाज न आल्याने बस चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, बस काही मीटर अंतरावर गेल्या नंतर ती सरळ नाल्यात कोसळली आणि वाहत जाऊ लागली, ही घटना काही प्रत्येक्षदर्शी नि बघितल्या नंतर काही तरुणांनी बस मधील प्रवाशांना वाचविण्यासाठी नाल्याच्या पुरात उड्या घेतल्य तो पर्यंत ही बस एका झाडाला अडकल्याने तरुणांनी बचाव कार्य सुरू केले। बस मध्ये 4 ते 6 प्रवाशी असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली मात्र एका मृतदेह सापडला असून दोघांना वाचविण्यात यश आले। तर सोन जण बस मध्ये अडकून असून बस ला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे बस नाल्याच्या पुरात वाहून जात असताना काही तरुण रस्त्यावर होते या पैकी एका तरुणाने बस वाहून जात असल्याचा व्हीडिओ आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात कैद केला रस्त्यावर असलेल्या काही नागरिकांनी मोबाईल मध्ये ही घटना कैद केली
  . . उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत.. व स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.. दोन लोक झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटीबस च्या टपावर आहेत..
त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.


ही थरारक दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून बघा





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने