ज्ञानेश्वर आढाव | देवळा प्रतिनिधी
देवळा तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्यांचा धुमाकूळ वारंवार लक्ष घालून ही वन विभागानचे दुर्लक्ष: शासनाने कराव्यात वेळेत उपाय योजना
देवळा तालुक्यातील दहिवड येथे जंगली प्राण्यांचा मुक्त वावर पुन्हा एकदा दिसून आला. दहिवड या गावाचा भौगोलिक दृष्ट्या जंगलाचा व डोंगराचा भाग लाभलेला त्यामुळे तेथे जंगली प्राण्यांचा मुक्त वावर ग्रामस्थांना पाहवयास मिळतो.
दहिवड या गावातील बऱ्याच लोकांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे.यापुवी ही बिबट्याच्या हल्यात अनेक पाळीव प्राण्यांना आपला जीव गमावला आहे.आज दहिवड येथील श्री.गोरख भिका वाघ ,यांच्या पिंपळे (येली झेली ) मळ्यात मेंढ्यांच्या वाडयाजवळ आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय घोड्याचा मुत्यू झाला.त्यामळे पुन्हा पुन्हा होणारे आर्थिक आणि जीविता धोका यामुळे मेंढपाळ व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा मेंढपाळ व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्यात मेंढीचा मुत्यू झाला होता.त्यावेळी सर्व व्यवसायिकांनी वन विभागाला विनंती केली की लवकरात लवकर बिबटयाचा बंदोबस्त करावा ही विनंती केली होती.
परंतु वन विभागाने काही च उपाय योजना केल्या नाहीत . त्यामुळे मेंढपाळ व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.हे असेच चालत राहिले तर मेंढपाळ व्यावसायिक वन विभागाच्या विरूद्धात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात येईल असे मेंढपाळ व्यावसायिकांनी सांगितले.त्यामुळे वेळेत वन विभागाने उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली.