नांदगांव ( प्रशांत गिरासे | मनोहर शेवाळे ) : नांदगाव तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु असुन नद्या-नाल्यांना पूर आला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला असून नागरिकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत,
यातच नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथील पांझन नदीवरील पुलावरून १ अंध व्यक्ती वाहून गेली आहे, निलेश जयप्रकाश परदेशी (३२)
असे पुलावरून वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून, पुलावरून पाय घसरून वाहत्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला, मृतदेह दोन तासाने पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी अनेक घरात पाणी शिरले आहे, नांदगाव तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले मागील आठवड्यातही नांदगाव शहरातील रेल्वेच्या पुलाखाली वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यात यश आले.
नांदगाव शहरातील लेंडी व शाकंभरी दोन्हीही नद्यांच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने व पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा ईशारा हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. तसेच दहेगाव धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी व नदीच्या प्रवाहापासून सुरक्षित स्थळी राहावे.