📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

चाकूचा धाक दाखवून नाशिकमध्ये 27 वर्षीय महिलेवर अत्याचार; पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराचे कृत्य

नाशिक (जय योगेश पगारे ) नाशकात ब्युटी पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, नाशिकच्या सिडको परीसरातील श्रीराम नगरमधे काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे, खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि सध्या पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारानं हे कृत्य केलं आहे यामुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील संशयित आरोपी नितीन सुभाष पवार (वय ३२) याने २०१३ मध्ये सिडकोतील शिवाजी चौक येथे त्याच्या नातलगातील दोन महीलेवर धारदार शस्त्राने वार करीत खून केला होता. याप्रकरणी पवार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली होती त्यामुळे तो कारागृहात होता. यातून करोना काळात काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर बाहेर आला असताना आरोपी नितीन पवार याने सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका महिलेच्या ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत बळजबरीने बलात्कार केला

नाशकातील अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात झाला आहे, घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
सबंध महाराष्ट्र गेल्या काही दिवसात बलात्काराच्या घटनेने अक्षरशः हादरून गेला आहे, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
स्त्रोत : मटा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने