ज्ञानेश्वर आढाव (वार्ताहर)देवपुरपाडे
आज दि.7/9/2021 देवळा तालुक्यातील रणादेवपाडे येथे कोवीशिलड लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता.जवळपास 350जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 100, दुसरा डोस 250असे उपलब्ध झाले होते.सदर लसीकरकॅम्प मध्ये प्रा.आ.केंद्र मेशीचे डॉ.महेश सुर्यवंशी, डॉ.डी.एस.बोरसे, वंदना बच्छाव (आ.सेविका),चंदन सिस्टर,सोमेश शेवाळे(डाटा ऑपरेटर)व आशा सेविका उपस्थित होते.
कॅम्प आयोजित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री.अजय अहिरे यांनी परिश्रम घेतले व रणादेवपाडे गावाचे जवळपास 60% नागरिकांचे लसीकरण केल्याबद्दल आरोग्य यंत्रणेचे स्वागत केले.व राहिलेल्या 40%नागरिकांचे लवकरात लवकर घेण्याची विनंती आरोग्य यंत्रणेला केली.
सदर कॅम्प साठी मार्गदर्शन श्री.अभिमन अहिरे यांनी केले व 100% नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे अशीही विनंती आरोग्य यंत्रणेला केली.गावातील सरपंच अनिता सोनवणे, मा. सरपंच सुमन बाई अहिरे,ग्रामपंचायत सदस्य अजय आहिरे,ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत,जिभाऊ सोनवणे,समाधान अहिरे, शाम अहिरे,आबा अहिरे, राम आहिरे, राकेश शेवाळे, रवी शेवाळे,गणू अहिरे, गोकुळ अहिरे, बाळा अहिरे, ग्रामविकास अधिकारी अरुण पाटील,सोमेश शेवाळे, विष्णू बंद्रे(ग्रा.प.कर्मचारी) यांनी ही पुर्णवेळ उपस्थिती दर्शविली तसेच सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.