मालेगाव (जय योगेश पगारे) मालेगाव शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पाणी निघण्यास सोय नसल्याने अनेक घरांत पाणी शिरले आहे, कलेक्टर पट्टा, पटेल नगर, बोरसे नगर आदी भागातही मोठ्या प्रमाणात पाण्याचे साम्राज्य असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, लहान मुले आबालवृद्धांची तर कमालीची गैरसोय होत आहे, प्रशासन झोपेचे सोंग घेवून बसले का असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत,
सोयगावात अनेक वाहने फसली
पारिजात कॉलनी ते मराठी शाळा सोयगाव पर्यंत भुयारी गटारी चे काम पूर्णत्वास आले आहे, परंतु खोदकामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून यामध्ये अनेक लहान-मोठी वाहने फसली आहेत