(वासोळ प्रतिनिधी: प्रशांत गिरासे)
*देवळा:* देवळासह वासोळ परिसरात सोमवारी पोळा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. तसेच वाजत गाजत बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. शेतकरी बांधवांनी पुरणपोळीचा नैवद्य देत बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
बैलजोडी आणि शेतकरी ही कृषीप्रधान देशाचे समिकरण आहे. तसेच वासोळगावातून बैलांची मोठ्या थाटामाटात हनुमान मंदिराला प्रदक्षिणा मारण्यात आल्या. त्यामुळे बैलांना शेतकऱ्याच्या जीवनात फार मोठे स्थान असल्याने बैलपोळा शेतकरी बांधव मोठ्याप्रमाणवर साजरा करतात. सोमवारी वासोळ येथे आदल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांनी आपल्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांच्या खांद्याला तेल लावून कोणतेही काम लावले नाही. तर सोमवारी पोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतातील विहिरीवर त्यांची स्वच्छ आंघोळ करून त्यांना सजवले होते. नवीन दोर, मोरखी, झुल, शिंगांण रंग, शिंगाणा फुगे बांधलेले दिसुन आले तसेच पाठीवर नक्षीकाम केले होते. त्यानंतर गावातील सर्व हनुमान मंदिराला प्रदक्षिणा करत शेतकऱ्यांनी दर्शन घेतले आणि बैलांना दीर्घा आयुष्य आणि चांगल्या हंगामाची प्रार्थना केली. त्यानंतर घरी येऊन त्यांची पुजा करीत त्यांना पुरणाच्या पोळीचा नैवद्य खाऊ घातला. या वेळी खाटीवर शेती उपोयगी साहित्य ठेवून त्यांचीही पूजा करण्यात आली.