📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे हवालदिल झालेल्या महिलेची आत्महत्या

नांदगांव (मनोहर शेवाळे )  अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे हवालदिल झालेल्या महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे 
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे  ही धक्कादायक घटना घडली आहे, मंदाबाई काकळीज असे आत्महत्याग्रस्त महिलेचे नाव असून  दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आठ एकर वरील मका ,कांदे व कापूस वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते, याच गोष्टीचा धसका  घेत महिलेने विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली
 याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत लवकरच सविस्तर वृत्त प्रसारित होईल 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने