📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ई-पिक पाहणी संदर्भात देवपुरपाडे येथे कार्यशाळा

ज्ञानेश्वर आढाव (वार्ताहर)देवपुरपाडे
    आज देवपुरपाडे येथे ई पिक पाहणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी तलाठी ए.वि .गावित यांनी प्रथम ई पिक पाहणी ॲप कसे डाऊनलोड करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच ई पिक पाहणी संदर्भात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्या समस्यांचे निरसन करण्याचे काम तलाठी तात्यांनी केले.परंतु तरी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची ई पिक पाहणी नोंदणी होत नाही. आज स्वतः तलाठी तात्या, ग्रामसेवक,कोतवाल महेश खरोले यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पिक पाहणी नोंदणी केली.त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांची नोंदणी केली.परंतू महालपाटणे सजा मोठी असल्यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीत ई पिक पाहणी होणे शक्य नाही. 
        त्यामुळे शासनाने ई पिक पाहणी ची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती महालपाटणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अभिमन बापू अहिरे , ग्रामस्थ यांनी केली.  
         ई पिक पाहणी कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, ग्रामसेवक,देवपुरपाडे ग्रामपंचायत सदस्य,देवपुरपाडे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष, संचालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने