📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

एकात्मता चौकात सिग्नल यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार!

एकात्मता चौकात सिग्नलच्या कामास सुरुवात
मालेगाव (जय योगेश पगारे) कुठल्याही शहराच्या वाहतुकीस नियंत्रणाचे काम करण्यात सिग्नल यंत्रणेची मोठी मदत मिळत असते, 
मालेगाव शहरात याआधीही एकात्मता चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होती परंतु काळाच्या ओघात ती बंद पडली होती, 
 कालाय तस्मै नमः आणि वेळेची गरज लक्षात घेता पुन्हा मोसम पुल चौकात काही महिन्यांपूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे काही अंशी का होईना वाहतुकीस शिस्त लागली, गेल्या दोन दिवसापासून एकात्मता चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे, पुढील दोन दिवसात पूर्ण होऊन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याची चिन्हे दिसत आहेत,
हळूहळू शहराचे बकाल स्वरूप बदलत असल्याने एकीकडे नागरिक खूश असले तरी दुसरीकडे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, त्यामुळे या गोष्टींकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने