प्रशांत गिरासे | पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव (ब) येथे कार्यरत असलेल्या वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बारकू नानाजी पवार हे परिसरातील बालाजी नगर येथे वीज बिल वाटप करत असताना दिनांक 26 रोजी आपले नियमित काम करत असताना विज ग्राहकाने मारहाण करून गलिच्छ शिवीगाळ केली आणि वीट फेकून मारहाण केली अशा आशयाची फिर्याद परिसरातील वीज कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दिली व तक्रार दाखल करत या घटनेचा निषेध नोंदविला आहे
या घटनेबाबत पोलिसात ग्राहकाविरुद्ध भादवि कलम 353,332, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस हवालदार पी.पी. देवरे करीत आहेत
विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे या घटनेचा निषेध
कर्तव्य वरील कर्मचाऱ्यावर अशाप्रकारचा हल्ला कदापि सहन केला जाणार नाही, व या हल्ल्याचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे, यावेळी संघटना प्रतिनिधी दीपक गांगुर्डे ,विष्णू शिरसाट ,महेश वाळुंज ,अमोल काळे ,हिरामण शिंदे ,प्रशांत केरे,सुभाष शिंदे आदीसह विज अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.