📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून पासून सप्तशृंगगड मंदिर गजबजणार

प्रशांत गिरासे | नांदुरी गड

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदुरी गडावरील मंदिर, येत्या सात तारखेपासून खुले होणार असल्याने भाविक-भक्त, व्यापारी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
तब्बल सहा महिन्यापासून महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने,  महाराष्ट्र शासनाने नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिल्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सप्तशृंगगडावरील आदिमाया सप्तशुंगी देवीचे मंदिर उघडणार असल्याने सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ भाविकभक्त आदिमायेच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे 
                साडेतीन शक्तीपीठांपैकी  अर्धे शक्तीपीठ असलेले सप्तशुंगीचे मंदिर हे कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर एक मार्च पासुन दर्शनासाठी बंद करण्यात आले होते, त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून सर्व धार्मिक उत्सव बंद होते त्यामुळे नवराञ व चैञोत्सवही बंद करण्यात आले होते 
                गडावरील विविध धार्मिक उत्सव तसेच पायी याञा व कावड याञा पालखी आदि उत्सव रद्द करण्यात आले असुन यामुळे गडावरील व्यापारी व ग्रामस्थ चे अर्थकारण गडावर येणारे भाविक व पर्यटनावर  अंवलुबन असते गडावर एक ही भविक गेल्या सहा महिन्यापासून न आल्याने सर्व अर्थचक्र ठप्प झाले होते त्यामुळे गडावरील दोन ते तीनशे  दुकानदारांना मोठया प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे पण महाराष्ट्र शासनाने येत्या नवराञच्या पहिल्या माळेला राज्यातील सर्व मंदिरे कोविड चे नियम पाळून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे गडावरील व्यापारी व ग्रामस्थ 
मध्ये आनंद चे वातावरण निर्माण झाले आहे

 कोविडचे नियम पाळून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे तसेच मास्क वापरणे बंधनकारक असेल भाविकांनी एकच ठिकाणी जास्त गर्दी करू नये तसेच आरोग्य दुष्टीने लस घेणे गरजेचे आहे त्यामुळे स र्व नियम पाळून कोरोना पासुन बचाव करावा लागणार आहे त्यामुळे सर्व नियमाचे पालन करून व्यापारी सह भाविकभक्तानी देवी संस्थान व प्रशासनास सहकार्य करावे लागणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने