मालेगाव (जय योगेश पगारे) शहरातील भावी फौजी ग्रुप मालेगाव तर्फे 7 सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे,
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या कारणामुळे महाराष्ट्रात जिल्हावार सैन्यभरती बंद आहे, केंद्र सरकारने तात्काळ सैन्यभरती घ्यावी व कोरोनामुळे वाया गेलेल्या दोन वर्षांमुळे वयात दोन वर्षाची सूट द्यावी अशा मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

इतर राजकीय, खासगी कार्यक्रमांना मंजुरी मिळत असेल तर सैन्य भरतीलाही तात्काळ मंजुरी द्यावी या संदर्भात हे निवेदन दिले जाणार आहे अशी माहिती निवेदन देणाऱ्या ग्रुपने दिली.
सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून शिस्तबद्ध पद्धतीने तसेच कुठलीही घोषणाबाजी न करता मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल अशी माहिती भावी फौजी ग्रुपने दिली आहे.