📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कळवण तालुक्यातील लाचखोर तलाठी जयवंत कांबळे यास अटक

कळवण ( जय योगेश पगारे )
 नाशिक जिल्ह्यात सध्या लाच मागण्याच्या  प्रकारांमध्ये कमालीची वाढ झाली असून, मागील दोन आठवड्यात नाशिक जिल्ह्यात लाचखोरीचे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत,  कळवण तालुक्यातील ओतुर येथील तलाठी जयवंत केदु कांबळे यांनी २५ हजाराची लाच मागितल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करुन त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक तर्फे अटक करण्यात आली आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर प्रकरणातील तक्रारदाराने कुंडाणे मधील ओतुर शिवारातील शेतजमीन विकत घेवून खरेदी केली. त्यानंतर सदर शेतजमिनीचे नाव सातबा-यावर नोंद करण्यासाठी तो तलाठी कार्यालयात गेला, येथे तलाठी कांबळे यांनी ३० हजाराची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. या सापळ्यात १८ ऑगस्ट रोजी ओतुर येथे तलाठी कांबळे यांनी ३० हजाराच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंतर २५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तलाठी कांबळे विरुध्द कळवण तालुका पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला.click here

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने