मालेगाव ( जय योगेश पगारे ) मालेगावची चिमुकली जिया दिनेश मोरे आपल्या नृत्य कौशल्याने संपूर्ण भारतात मालेगावचा लौकिक उंचावतेय,
सहा वर्षे वयाची हि मालेगावची स्टार झी टीवी वर प्रदर्शित होणाऱ्या डान्सका दंगल मध्ये सहभागी होणारी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात लहान एकमेव मुलगी आहे, लवकरच तिचा नृत्यविष्कार झी टीवीच्या डान्सका दंगल या रियालिटी शो मध्ये बघावयास मिळणार आहे
ह्या चिमुरडीचे tiktok वर खूप फोलोवर्स होते व सोशल मिडीयावर तिच्या डान्सने धुमाकूळ घातला होता, आता तिचे रील्स इंस्टाग्राम मोठ्या प्रमाणात बघितले जात असून सुमारे 2 लाखांच्या आसपास तिचा एक रील बघितला गेला आहे ,
त्याबरोबर इंस्टाग्राम वर तिचे २६ हजार + फोलोवर्स आहेत