मालेगाव (जय योगेश पगारे) नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशन कडून हेल्मेट सक्तीचे स्वागत करण्यात आले आहे परंतु नो हेल्मेट नो पेट्रोल धोरणास आमचा पाठिंबा नाही असे निवेदन शिष्टमंडळाने पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ यांची भेट घेऊन दिले आहे.
जिल्ह्यात सुमारे साडेचारशे पंप डीलर असणारी ही संघटना आहे पोलीस आयुक्त नाशिक शहर व नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत ऑगस्ट 2021पासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे यासंदर्भात शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल ही योजना प्रस्तावित केली असून त्यात हेल्मेट नसेल त्यांना पेट्रोल देण्यात येऊ नये व जर पंप चालकाने पेट्रोल दिले तर त्यांच्यावर कारवाई होईल किंवा त्यांच्या लायसन रद्द करण्याचे सूतोवाच एका वृत्तपत्रातील बातमीतून दिसून येत होते सदरचा निर्णय एकतर्फी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे याशिवाय संघटनेसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याने सदरचा निर्णय आमच्यावर लादली जाण्याची शक्यता असल्याने आमच्या काही अडचणी आहेत त्या शासनाने समजून घ्याव्यात असे संघटनेतर्फे निवेदनात म्हटले आहे
मुंबई येथे 23 ऑगस्ट 2016 रोजी हेल्मेट घातले नाही म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी एका युवकास पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना हटकले त्यातून उद्भवलेल्या वादाचं शिंदे यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर शासनाने पेट्रोल साठीहेल्मेट सक्ती संदर्भातील निर्णय मागे घेतला होता, तसेच करूना च्या काळात पेट्रोल पंप डीलर हे अखंड सेवा पुरवत होते तसेच इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने सर्वांची आर्थिक गणित कोलमडले असल्याने शासनाचे अप्रत्यक्ष कराचे संकलन करणे व ग्राहकाला सेवा देणे अशी मुख्य जबाबदारी पेट्रोल पंप चालकांवर आहे त्यात हेल्मेट शक्तीसाठी जनजागृती करण्यास व प्रशासनाला सहकार्य करण्यास पेट्रोल पंपाचा ला तयार असून ग्राहकांना आम्ही सक्ती करू शकत नाही ही आमची मुख्य अडचण आहे असे निवेदनात म्हटले आहे तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवा अधिनियमात ग्राहकाला इंधन नाकारण्यात पंप चालकांना कोणतेही अधिकार नाही व तसे कायदेशीर संरक्षण देखील नाही, पोलीस यंत्रणा मोठी असून त्यांच्याकडे सर्व वैधानिक अधिकार आहे त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून कायद्याचे संरक्षण प्राप्त आहे अशाप्रकारे नो हेल्मेट नो पेट्रोल धोरणात डिलरची कुचंबना होऊन पेट्रोल पंप व ग्राहक यांच्यामध्ये वाद होऊन कर्मचाऱ्यांचे जीवनासही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासनाने हे धोरण राबविताना प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस अधिकारी पूर्ण वेळ द्यावा जेणेकरून हेल्मेट सक्ती संदर्भातील निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करता येईल अशा प्रकारचे निवेदन नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांना दिले आहे

