पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादि याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो.
पुदिन्याचे आयुर्वेदिक फायदे.
१) पुदिन्याची चटणी बनवून अर्धी वाटी चटणी मध्ये चमचे लिंबाचा रस मिसळावा व हे मिश्रण सकाळी अंघोळीच्या आधी चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करावा. नियमित केल्याने चेहऱ्यावरील मुरूम निघूनजातात, वांग निघून जातात. व चेहरा तेजस्वी बनतो.
२) पंधरा-वीस पुदिन्याची पाने दोन काळी मिरी चूर्न एक आल्याचा तुकडा हे सर्व एकत्र करून चेचून घ्यावे व तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळून घ्यावे. प झाल्यानंतर दिवसातून दोन-तीन वेळा पिने सर्दी ताप खोकला आजार नष्ट होतात.
३) अपचन पोटदुखी गॅसेस या आजारांमध्ये तीन ते चार चमचे पुदिन्याचा रस एक चमचा लिंबू चा रस व एक काळीमिरी चूर्ण एकत्र करून दिवसातून दोन-तीन वेळा चाटणी केल्याने वरील समस्या दूर होतात.
४) पुदिन्याचा रस काढून केसांना लावल्याने केस गळती कमी होते केस काळे व चमकदार होतात.
५) अडलेली लघवी साफ होण्यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा दोन दोन चमचे #पुदिन्याचा रस सेवन करावे वरून एक ग्लास थंड पाणी प्यावे.
६) पुदिन्याच्या पानाचा दोन ते तीन चमचे रस सकाळी उपाशी पोटी सेवन करून वरून एक कप पाणी पिल्याने आम्लपित्ताचा त्रास नष्ट होतो.
७) कोणत्याही प्रकारचे विषारी किडे वगैरे चावल्यानंतर होणारी आग भडके थांबवण्यासाठी पुदिन्याच्या पानाचा रस काढून दंश केलेल्या ठिकाणी चोळावे.
८) वारंवार लागणारी उचकी थांबवण्यासाठी दोन चमचे पुदिन्याचा रस व एक चमचा मध दोन्ही एकत्र करून दिवसातून तीन-चार वेळा घेतल्यावर उचकी त्वरित बंद होते.
९) गर्भवती महिलांना नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा नव्या महिन्यानंतर वेदना सुरू झाल्यावर २०-३० ml पुदिन्याचा रस पंधरा-वीस मिनिटांच्या फरकाने दोन-तीन वेळा दिल्याने नॉर्मल डिलिव्हरी होते.
१०) वारंवार होणारा शीत पित्ताचा त्रास थांबवण्यासाठी पुदिन्याचा रस 30 ते 40 ml दिवसातून दोन-तीन वेळा द्यावे व अंघालाही चोळावे. यामुळे शेत पित्ताचा त्रास त्वरित कमी होतो.
११) नियमित पुदिन्याच्या पानाचा काढा करून पिल्याने कॅन्सर पासून आपल्या शरीराचे रक्षण होते,
१२) नियमित सकाळी उपाशी पोटी #पुदिन्याच्या पानाचा काढा सेवन केल्याने मासिक पाळीच्या दरम्यान होणारा महिलांचा त्रास कमी होतो, व लहान मुलांची स्मरणशक्ती
१३) नियमित पुदिनाचा काढा पिल्याने लिव्हर च्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
निरोगी राहा आनंदी राहा...
........ धन्यवाद..........
राजीवचैतन्य निसर्गोचार केंद्र कराड.
निसर्गोचार तज्ञ डॉ. सचिन मेटकरी
(झिरो बजेट आरोग्य)