पालघर ( विशेष प्रतिनिधी ) विरार प. मधील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये झालेल्या दुर्घटनेत आगीत होरपळून तेरा रुग्ण मृत्युमुखी पडले.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की आज पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी हॉस्पिटल मधील एक ए सी च्या युनिटमध्ये स्पोट झाला त्यामुळे सदर आग लागली असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे परंतु या आगीमध्ये उपचार घेणाऱ्या 16 पैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे