📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दुर्दैवी : दिल्लीत ऑक्सिजन अभावी पंचवीस रुग्ण दगावले

देशातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अत्यंत भयानक झाली असताना ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यातच आता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. अजूनही या रुग्णालयात 60 रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की ऑक्सिजनचा पुरवठा अजून केवळ दोनच तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बाय पँप मशीन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून दिल्लीमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात एक आणिबाणीचा प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता; पण या ठिकाणी वेळेत ऑक्सिजनचा टँकर आल्याने मोठा अनर्थ टळला 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने