🔥🚒 मालेगाव शहराचा अविभाज्य भाग असलेला सोयगाव येथील सरकारी दवाखाना व फायर स्टेशनच्या मागील झुडपांमध्ये मोठी आग लागली असून या आगीची दाहकता व तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळत आहे या ठिकाणी फायरब्रिगेड दाखल झाली असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत,
सुदैवाने आतापर्यंत कुठल्या प्रकारचे जीवित वा वित्तहानी झाली नाही
अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आग ही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे लागलेली असू शकते, परंतु मालेगाव लाईव्ह च्या माहितीनुसार या परिसरात टवाळखोर तसेच तळीराम वाढलेल्या झुडपात येऊन विडी सिगारेट दारू पिण्याचे काम करीत असतात, त्यामुळेही अशी घटना होऊ शकते.
अग्निशामक चे कर्मचारी आटोकाट प्रयत्न करून येत आहे सदर ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काटेरी झुडूप असल्यामुळे आग विझविण्याच्या कामात अडथळा येत आहे, तरीही अग्निशामक चे कर्मचारी अडथळ्यांवर मात करीत शर्थीचे प्रयत्न करीत आहे
Tags
fire