देवळा (सोमनाथ जगताप) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देवळा तालुक्यात गुरुवारी (२२) रोजी पोलिसांनी चार जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की ,राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व कडक निर्बंध घातले आहेत . मात्र ,या आदेशाचे सर्वत्र उल्लंघन होत असल्याची ओरड येऊ लागल्याने पोलीस प्रशासन आता एक्शन मोडवर आले आहे . त्यानुसार देवळा तालुक्यात गुरुवारी (दि २२) रोजी पोलिसांनी ठिक ठिकाणी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक आदेश पायदळी तुडविणाऱ्या चार जना वर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईने नियम मोडणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून, काहींचे धाबे दणाणले आहेत . या कारवाईत लग्न सोहळ्यात विना मास्क प्रकरणी जयराम शिरसाठ ,पिंपळगाव (वा) यांचे कडून - १५ हजार , संजय कारभारी भामरे ,पिंपळगाव (वा)लग्न सोहळ्यात विना परवाना मंडप प्रकरणी - 11 हजार , शिवनाथ भामरे (वाखारी ) यांचे कडून लग्न सोहळ्यात विना परवाना मंडप प्रकरणी - ११ हजार व रुपेश मेणे (देवळा, वाखारी रोड) यांचे कडून उल्लंघन प्रकरणी १० हजार रुपये असा एकुण ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली . या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे . कोरोनाचा सर्वत्र विस्फोट झाला असतांना रुग्णांना बेड , ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे . ही वाढती रुग्ण संख्या व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली असून, यात कडक निरबन्ध लादले असतांना याची व्यावसायिक व इतर लोकांकडून पायमल्ली होतांना दिसत असल्यांस प्रशासनाने आता कडक पाऊले उचलली आहेत. अशा प्रकारच्या कारवाईच्या बडग्याने आता तालुक्यात खळबळ उडाली आहे .
फोटो - कोरोना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी देवळा पोलिसांनी केलेली दंडात्मक कारवाई . (छाया - सोमनाथ जगताप )