📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

बालिकेवर अत्याचार प्रकरणी टिक टॉकर ला अटक

सोशल मीडिया वर फनबास्केट भार्गव नावाने ओळख असलेल्या tiktoker भार्गव ने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर आहे.
आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भार्गव ने पीडित मुलीला तिचे tiktok व्हिडिओ बघून प्रपोज केला होता, पण त्यावेळी तिने नकार दिला होता पण भार्गव ने तिला माझ्याकडे तुझे आक्षपार्ह व्हिडिओ आहेत असे खोटे नाटे सांगून जाळ्यात फसवत नंतर ब्लॅकमेल करत वेळोवेळी अत्याचार केला, सदर प्रकरणातून मुलगी ४ महिन्यांची गरोदर राहिली अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली.
पीडित मुलीच्या पालकांनी विशाखापट्टणम मधल्या पेंडूर्थी पोलीस स्थानकात भार्गव विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
सध्या शालेय मुलां/ मुली मध्ये ही सोशल मीडिया मधले अशा या फालतू गोष्टींचे खुळ वाढत चालले आहे, पोलिसांनी पालकांना आपल्या मुलींकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करत मुलींनाही अशा व्हायरल व्हिडिओज मध्ये असलेल्या तरुणांशी संपर्क न करण्याचे आवाहन केले आहे..
पालकांनी आपल्या मुला-मुलींना अशा प्रकारच्या सोशल साइट्स वर आपले फोटो अपलोड करताना विशिष्ट सेटिंग नुसार केवळ आपल्या जवळच्या लोकांना दिसतील अशाप्रकारे ठेवणे गरजेचे आहे, निव्वळ टाईमपास साठी असलेल्या वस्तूंना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे कसे आपल्या आयुष्याचे नुकसान करू शकते हे समजावून सांगणे गरजेचे आहे...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने