📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

18+ कोविड लसीकरण 'येथे ' करा रजिस्ट्रेशन

मालेगाव  (जय योगेश पगारे ) 1 मे पासून  18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे लसीकरण करण्यासाठी कोवीन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
 यावर बोलताना नॅशनल हेल्थ अथॉरिटी चे सीईओ शर्मा गुरुवारी म्हणाले की 18 वर्षांवरील सर्वांसाठी व्हॅक्सिनेशन रजिस्ट्रेशन 28एप्रिल रोजी सुरू होईल कोवीशिल्ड व कोवॅक्सिन  शिवाय लसीकरण केंद्रावर रशियन लस स्पुटनिक वि याचाही पर्याय उपलब्ध असणार आहे.
 दरम्यान कोरोना बाधित रुग्णांच्या  वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीकरण मोहीम आता तीव्र करण्यात येणार आहे गुरुवार च्या दहाव्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 लसीचा डोस देण्यात आलेले आहेत तर मागील 24 तासात 22 लाख 11 हजार 334 जणांना लस देण्यात आलेली आहे..

 देशातील कोरोनाबाधित तरुणांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे, त्यामुळे 45 वर्षाची शिथील करत शासनाने येत्या एक मेपासून 18 वर्षावरील सर्वांनाच लस देण्याचे घोषित केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने