केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड रुग्णांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे धोरण बदलले आहे. नवीन धोरणानुसार, कोविड विषाणूचा संसर्ग असलेल्या कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सकारात्मक प्रमाणपत्र आवश्यक नाही. पूर्वी, कोविडचा सकारात्मक अहवाल किंवा सीटी स्कॅन रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक होते. covid 19 रुग्णाच्या लक्षणानुसार त्याला सीसीसी, डीसीएससी आणि डीएससी मध्ये भरती करण्यात येणार आहे.
जाणून घ्या काय आहेत नवीन नियम
*संशयित कोणताही व्यक्ती रुग्णालयात ऍडमिट होऊ शकतो.
*रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रिपोर्टची गरज नाही
*कोणत्याही शहरातील कोणत्याही रुग्णाला ओळखपत्र नाही म्हणून रुग्णालयात ऍडमिट करण्यावाचून रोखता येत नाही.
*कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन आणि औषध घेण्यापासून वंचित ठेवता येणार नाही मग तो कुठल्याही शहरात राहणारा असो. रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच
*रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल रुग्णालयात ऍडमिट करण्याची गरज नसतानाही रुग्णाने बेड अडवून ठेवले तर नाही ना हे पाहणे बंधनकारक आहे.