डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल २०२० मध्ये लॅबमध्ये या औषधावर प्रयोग केला होता. या प्रयोगात कळालं की, हे औषध कोरोना व्हायरस रोखण्यासाठी मदत करू शकतं. त्याआधारे DCGI ने मे २०२० मध्ये या औषधाच्या फेज २च्या चाचणीसाठी मान्यता दिली.
क्लीनिकल चाचणीत काय आढळलं?
फेज २ मध्ये देशातील हॉस्पिटलमध्ये या औषधाची चाचणी घेण्यात आली. फेज २ ए चाचणीचे ६ आणि फेज २ बी चाचणी ११ हॉस्पिटलमध्ये केली. ११० रुग्णांचा यात समावेश होता. ही ट्रायल मे ते ऑक्टोबर दरम्यान घेतली गेली. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या रुग्णांना हे औषध दिलं ते इतरांच्या तुलनेत लवकर बरे झाले. चाचणीत सहभागी रुग्ण दुसऱ्या रुग्णांच्या तुलनेत २.५ दिवस आधीच ठणठणीत झाले.
फेज ३ मध्ये डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान देशातील २७ हॉस्पिटलमध्ये चाचणी घेतली. यात २२० रुग्णांचा समावेश होता. ही चाचणी दिल्ली, यूपी, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडूत झाली. ज्या रुग्णांना 2 DG हे औषध दिलं त्यातील ४२ टक्के रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची गरज तिसऱ्या दिवशी संपली. परंतु औषध न घेतल्याला ३१ टक्के रुग्णांना ऑक्सिजनवर निर्भर राहावं लागत होतं. म्हणजे हे औषध मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता कमी करतं. यात ६५ वर्षावरील वृद्धांमध्येही जे जाणवून आलं.
हे औषधं कसं काम करतं?
हे औषध पावडरच्या स्वरुपात दिलं जातं. जे पाण्यात मिसळून प्यायचं असतं. हे औषधं संक्रमित कोशिकांमध्ये जमा होतं आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करणाऱ्या व्हायरसला रोखतं. हे औषध खूप फायदेशीर ठरत आहे. देशात वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशातच या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना जास्त काळ हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही असं दावा केला जात आहे.