महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, के.बी.एच.विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथेआषाढी एकादशीनिमित्त विद्यालयात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख परिक्षित नेरकर यांनी विद्यार्थ्यांना वारीचे महत्त्व व वारीचा इतिहास आपल्या अनमोल वाणीतून समजावून सांगितला. व येणाऱ्या भावी पिढ्यांनी वारीचा हा वसा जपला पाहिजे असे आवाहन केले.यावेळी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबाचे अभंग गात शिक्षणातील पांडुरंग कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधी पासून शालेय परिसरात दिंडी काढली व शालेय परिसर दुमदुमून काढला. यावेळी प्राचार्य प्रफुल्ल निकम, उपप्राचार्य नितीन गवळी, पर्यवेक्षक राजेश धनवट उपस्थित होते. हभप माधवराव शेवाळे, ह भ प तुकाराम देवरे, राजेंद्र शेवाळे, जयवंत व्याळीज, के. डी. शेवाळे आर.के.बोरसे,एस.डी.महाले,एस.आर.नेरकर आदीनीअभंग गायन केले.