📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दसरा मैदानातील अतिक्रमण हटवून तार कंपाऊंड करण्याची मागणी

मालेगाव मनपा हद्दीतील मौजे संगमेश्वर शिवारातील दसरा मैदान (गट क्र. १०४/अ व ११३) या गायरान जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवून शासनाच्या मालकीची जागा संरक्षित करण्यासाठी तार कंपाऊंड करण्यात यावे, अशी मागणी आज उपजिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

रामदास खंडू बोरसे, निखिल बाळासाहेब पवार आणि भरत विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या जागेवर भूमाफिया व गावगुंडांकडून बेकायदेशीर अतिक्रमण करून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असून, त्यामुळे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रावणदहन कार्यक्रमात अडथळे निर्माण होत आहेत.

तसेच चंदनपुरी गेट ते झांझेश्वर मंदिर मार्गावरील अतिक्रमण हटवून भाविकांसाठी योग्य रस्ता तयार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने यापूर्वी झालेल्या दोन बैठकींत कारवाईचे आदेश दिले असतानाही अद्याप अंमलबजावणी न झाल्याने, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने