📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळा

(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या आधुनिक जगात ताणतणाव हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आपल्यावर आलेल्या संकटांशी दोन हात करताना जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहे, असे आपल्याला वाटू लागते. तेव्हा स्ट्रेस / टेन्शनची जाणीव आपल्याला होते. आणि विशेषता विद्यार्थ्यांना अधिकच स्ट्रेस चा सामना करावा लागतो. स्ट्रेस किंवा डिप्रेशन मुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. यासाठीच महाविद्यालयातील विद्यार्थी विकास कक्ष, महिला सुरक्षा आणि विकास मंडळ आणि विद्यार्थिनी आरोग्य कक्ष यांच्यातर्फे सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सलमा अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख व्याख्याता म्हणून एस पी एच महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रजनी पाटील, नामपूर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ सुरेखा दप्तरे आणि डॉ सलमा अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी वर्क अँड लाइफ बॅलन्स या विषयावर मार्गदर्शन केले. जीवनात आनंदी राहण्यासाठी कामामध्ये समतोल कसा राखावा यावर मार्गदर्शन केले. डॉ रजनी पाटील यांनी मेडिटेशन अँड स्ट्रेस मॅनेजमेंट यावर मार्गदर्शन केले. जीवनातील ताण तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशनचा कसा उपयोग होतो याबाबत विवेचन केले. डॉ. सुरेखा दप्तरे यांनी टाईम मॅनेजमेंट टू रेड्यूस स्ट्रेस या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेत असताना वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मेश्रामकर सुनेत्रा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ फरझाना यांनी केले. प्रा सफिया अन्सारी यांनी उपस्थितांचे आभार मानल्यावर कार्यशाळेची सांगता झाली. डॉ लोधी कनीझ फातेमा यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. दीडशेहून अधिक विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने